खोकी धारकांवर पुन्हा हातोडा, पालिकेची मोहीम तीव्र, साताऱ्यात पोलिस बंदोबस्तात पान टपऱ्याही काढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:10 PM2017-12-21T14:10:01+5:302017-12-21T14:44:00+5:30

सातारा नगरपालिकेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. गुरुवारी सकाळपासून कालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येत होती. खोक्याबरोबरच पान टपऱ्याही पोलिस बंदोबस्तात काढण्यात आल्या.

Hatha, cadre campaign expeditious in box holders, Satara police constables get leaf leaks | खोकी धारकांवर पुन्हा हातोडा, पालिकेची मोहीम तीव्र, साताऱ्यात पोलिस बंदोबस्तात पान टपऱ्याही काढल्या

खोकी धारकांवर पुन्हा हातोडा, पालिकेची मोहीम तीव्र, साताऱ्यात पोलिस बंदोबस्तात पान टपऱ्याही काढल्या

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात पोलिस बंदोबस्तात पान टपऱ्याही काढल्याकालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविली पोलिस बंदोबस्तात काढण्यात आल्या खोक्याबरोबरच पान टपऱ्या

सातारा : सातारा नगरपालिकेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. गुरुवारी सकाळपासून कालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येत होती. खोक्याबरोबरच पान टपऱ्याही पोलिस बंदोबस्तात काढण्यात आल्या.

सातारा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तीन दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी रविवार पेठ भाजी मंडईतील ११ खोकी काढण्यात आली होती. बुधवारी ही मोहीम रेंगाळली होती. कारण, संपूर्ण दिवस विक्रेत्यांना हुसकावण्यातच गेला होता.

गुरुवारी तिसऱ्या दिवशी कालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली आहे. या मार्गावर १५ च्या आसपास खोकी आणि पान टपऱ्या आहेत. जेसीबीच्या साह्याने आणि पोलिस बंदोबस्तात येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

दुपारी साडेबारापर्यंत तीन खोकी काढण्यात आली होती. काढलेली ही खोकी पालिकेचे कर्मचारी येथील हुतात्मा स्मारकात नेऊन ठेवत होते. या कारवाईवेळी काही खोकी धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती.

Web Title: Hatha, cadre campaign expeditious in box holders, Satara police constables get leaf leaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.