हजारमाची विलगीकरण कक्ष बनेल पथदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:00+5:302021-05-27T04:42:00+5:30

ओगलेवाडी : ‘कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावोगावी विलगीकरण कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतींना प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. हजारमाची ...

Hazarama's separation room will be a guide | हजारमाची विलगीकरण कक्ष बनेल पथदर्शक

हजारमाची विलगीकरण कक्ष बनेल पथदर्शक

Next

ओगलेवाडी : ‘कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावोगावी विलगीकरण कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतींना प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. हजारमाची ग्रामपंचायत व लाईफ फाउंडेशनने सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात उपलब्ध सोयी, सुविधा व उपचार पहाता हे विलगीकरण कक्ष तालुका व जिल्ह्यात पथदर्शक ठरत आहे,’ असे गौरवोद्गार सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.

हजारमाची ग्रामपंचायत व लाइफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील आत्माराम विद्यामंदिर येथे सुरू केलेल्या आणि उत्तम प्रकारे चालवलेल्या विलगीकरण कक्षास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन पहाणी केली.

यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, मंडल अधिकारी विनायक पाटील, डॉ. अनिकेत पालसांडे, सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण चार ते पाच दिवसांनंतर गावात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष स्थापन झाल्यास गावातील सर्व रुग्ण एकाच ठिकाणी थांबतील. यामुळे त्यांना उपचार, सेवा देणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे शक्य होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी गावात विलगीकरण कक्ष स्थापन करावा, ही आज काळाची गरज बनली आहे. याच मार्गाने जाऊन आपण आपला जिल्हा व तालुका कोरोनामुक्त बनवू शकतो. त्यासाठी महसूल, आरोग्य व पंचायत समिती प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.’’

यावेळी, सदस्य कल्याणराव डुबल, जगन्नाथ काळे, अवधुत डुबल, प्रल्हादराव डुबल, विश्वासराव पाटील, दीपक लिमकर, पराग रामुगडे, सर्जेराव पानवळ, मुरारजी माने, मिलिंद सुर्वे, धनाजी माने, गणेश घबाडे, लाईफ फाउंडेशनचे सदाशिव साळुंखे, कृष्णत काळे, सतीश डावरे, विजय भोसले, जयवंत मुळीक, सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयसिंह पवार, तलाठी श्रीकृष्ण मर्ढेकर, ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर व कर्मचारी उपस्थित होते.

२६ओगलेवाडी

फोटो : ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील विलगीकरण कक्ष भेटीप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील समवेत अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Hazarama's separation room will be a guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.