अपघाताने आलेल्या अपंगत्वाने तो बनला अनेकांचा मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:11+5:302021-01-13T05:43:11+5:30

सातारा : अभ्यासात हुशार, मेंदूही तल्लख, तो मेकॅनिकल इंजिनिअर झाला, पण मेंदूच्या आजाराने त्याला गाठलं अन् त्याची श्रवणशक्ती व ...

He became a guide for many due to his accidental disability | अपघाताने आलेल्या अपंगत्वाने तो बनला अनेकांचा मार्गदर्शक

अपघाताने आलेल्या अपंगत्वाने तो बनला अनेकांचा मार्गदर्शक

Next

सातारा : अभ्यासात हुशार, मेंदूही तल्लख, तो मेकॅनिकल इंजिनिअर झाला, पण मेंदूच्या आजाराने त्याला गाठलं अन् त्याची श्रवणशक्ती व वाचा गेली. डाॅक्टरांचे इलाजही खुंटले, पण निराश न होता त्याने परिस्थितीशी झगडा देण्याचं ठरवलं. स्पर्धा परीक्षा देत असतानाच पेन्शनधारक शासकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिक दुर्बल /शारीरिक अपंगत्व असलेल्या पाल्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी सागर रमेश भोकरे मदतगार ठरत आहे.

संगम माहुली फाट्याजवळ, राजभोई हौसिंग सोसायटीत सागर आई, भाऊ, भावजय यांच्यासह राहतो. वडील पोलीसमध्ये असताना त्यांचे अकाली निधन झाले. थोरला भाऊ बँकेत. साताऱ्यात मेकॅनिकल इंजिनिअरचा डिप्लोमा सागरने पूर्ण केला. हे शिक्षण घेत असतानाच त्याचा चालताना तोल जाऊ लागला. वैद्यकीय तपासण्यातील निष्कर्षाने कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचे समजले. गेल्या ४-५ वर्षांत त्याच्यावर ३ शस्त्रक्रिया झाल्या, पण त्याचा इलाज झाला नाही.

या ऑपरेशनमध्ये त्याच्या कानाच्या नसा कट कराव्या लागल्या. त्यामुळे तो ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, व्यवस्थित चालू ही शकत नाही; परंतु या आजाराने न डगमगता सागरने मात्र आर्ट ऑफ लिव्हिंगचा साधक होऊन सूर्यनमस्कार, प्राणायम, आदी साधना नित्यनियमाने करत राहिला. स्पर्धा परीक्षा देत राहिला. २०१९ साली रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण झाला. फिटनेस सर्टिफिकेटअभावी त्याला चांगल्या नोकरीला मुकावे लागले.

याही परिस्थितीत त्याने सेवा व्रत हाती घेतले.

पेन्शनधारक शासकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिक दुर्बल /शारीरिक अपंगत्व असलेल्या पाल्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी सागर २०१८ पासून विनामोबदला मदत करतो. आतापर्यंत त्याने २२ गरजूंना मदत केली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांगांना संघटित करण्याचे कार्य तो करतो. स्वतः अपंग असतानाही कोविड -१९ जागतिक महामारीच्या काळात इतर दिव्यांगांना मदत केल्याबद्दल त्याचा ''दिव्यांग योद्धा पुरस्कार'' देऊन सन्मान करण्यात आला.

चौकट

वयाच्या २५ व्या वर्षी सागरला अपंगत्व आलं. तरी तो रोज १०० सूर्यनमस्कार घालतो. १२-१२ तास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. इतर होतकरु उमेदवारांना मार्गदर्शन करतो. त्यांना वाचायला आवश्यक पुस्तकही देतो. ऐकायला येत नसल्याने टीव्हीवरच्या बातम्यांमधील खाली येणाऱ्या स्ट्रीप वाचून चालू घडामोडी समजून घेतो. वृत्तपत्रांप्रमाणेच टीव्हीवर चित्र पाहून बातम्या समजून घेण्याची त्याला सवय झाली आहे.

कोट ..

मी रोज सूर्यनमस्कार घालतो. त्यामुळे मन फ्रेश राहाते. चालताना तोल जात असल्याने पुस्तकं हाच माझा आधार झाली आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं घेत गेलो. माझ्याकडे पुस्तकांचा चांगला संग्रह आहे. त्यातच रमायला होतं. मला अपंगांसाठी फूड/मटेरियल पॅकिंगची कंपनी सुरू करायची इच्छा आहे. कारण अपंगांना स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे.

सागर रमेश भोकरे

सातारा

फोटो आहे

_____________________

Web Title: He became a guide for many due to his accidental disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.