घरात घुसून एकावर दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:55+5:302021-06-26T04:26:55+5:30

वाई : वाई तालुक्यातील आसले येथे तीन जणांनी घरात घुसून दांडके व धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी ...

He broke into the house and beat one of them with a stick | घरात घुसून एकावर दांडक्याने मारहाण

घरात घुसून एकावर दांडक्याने मारहाण

Next

वाई : वाई तालुक्यातील आसले येथे तीन जणांनी घरात घुसून दांडके व धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. त्यास सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अझर जब्बार इनामदार असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, हणमंत किसन कणसे (रा. आसले, पिराचीवाडी) यांनी घरालगतच्या जागेत पाटा गॅरेज अल्लाउद्दीन शफीअहमद सय्यद यांना चालवण्यास दिले आहे. तसेच घरापुढील मोकळ्या जागेत शेडमध्ये जुने टायर विक्रीचे दुकान आहे. पाटा गॅरेज दोन वर्षांपूर्वी त्यांनी अजहर जब्बार इनामदार यांना भाड्याने चालवण्यास दिले आहेत. अझरची चांगली ओळख बनल्याने ते कणसे यांच्या घरी नेहमी येत-जात असतात. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे अझर इनामदार कणसे यांच्या घरी आले होते. घरात कणसे यांची मुलगी, गॅरेजमधील कामगार फैजमुन्ना खान हेही होतेे.

टीव्ही पाहत असताना रात्री बाराच्या सुमारास अचानक अनोळखी तीनजण मास्क लावून घरात घुसले.

त्यांनी अजहर इनामदार यांस हाताने व दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. झटापट सुरू असताना अजहर याने त्यांना ढकलून घराचे बाहेर काढत असताना एकाच्या हातातील दांडके अजहरने हिसकावून एकाचे डोक्यात मारले व त्यांना ढकलून घराचे बाहेर काढले. यावेळी त्यातील एकाने अजहर यांच्या पोटाचे उजव्या बाजूला धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे अझरच्या पोटातून रक्तस्राव होऊ लागला. आरडा-ओरडा झाल्याने तिघेजण पळून गेले. त्यानंतर कणसे यांनी अजहर यास त्याच्याच कारमधून वाई येथे उपचारासाठी आणले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मिशन हाॅस्पिटल वाई येथून यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

याप्रकरणी हणमंत कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: He broke into the house and beat one of them with a stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.