निवेदन द्यायला आले आणि वृक्षारोपण करून गेले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:05+5:302021-07-24T04:23:05+5:30
वडूज : केंद्र शासनाच्या भरमसाठ इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांच्या आवाहनाला ...
वडूज : केंद्र शासनाच्या भरमसाठ इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जनतेला वेगळा संदेश दिला.
महागाई दरवाढ व स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्यावतीने तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. सातत्याने होणाऱ्या दरवाढीने येथील जनता मेटाकुटीला आली असून केंद्र सरकारने ही अवाजवी दरवाढ तत्काळ मागे घ्यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार किरण जमदाडे यांनी वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करताच आमदार शशिकांत शिंदे, माजी सभापती संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, प्रा. बंडा गोडसे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी सभापती विजय काळे, सचीन माळी, संदीप गोडसे, शशिकला देशमुख, आप्पासाहेब गोडसे, बाळासाहेब पोळ, एस. पी. देशमुख, प्रा. अर्जून खाडे, सुहास पिसाळ, ज्ञानेश्वर शिंदे, शैलेश वाघमारे उपस्थित होते.
यावेळी तहसील कार्यालय परिसरात ६७ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पिंपळ, वड, चिंच यांसह फळ व फूल रोपांचा समावेश होता. यावेळी वनविभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
फोटो : २३वडूज तहसीलदार
वडूज तहसील कार्यालय परिसरात आमदार शशिकांत शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांनी वृक्षारोपण केले. (छाया : शेखर जाधव)