निंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:28 PM2020-07-02T15:28:47+5:302020-07-02T15:30:27+5:30

निंबळक हद्दीत एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली. यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. ​​​​​​​

He killed a woman in Nimbalak and threw her body in a well | निंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकला

निंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकला

Next
ठळक मुद्देनिंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकलाओळख पटविण्याचे काम सुरू : दोेरीने बांधून मृतदेह चादरीत बांधलेला

फलटण : निंबळक हद्दीत एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली. यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत माहिती अशी की, निंबळक हद्दीतीळ एका विहिरीमध्ये बुधवार, दि. १ रोजी खून केलेल्या एका महिलेचा मृतदेह टाकला असल्याची माहिती पोलीस पाटलाला मिळाली. त्यानंतर पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका लाल रंगाच्या चादरीमध्ये मानवी मृतदेह दोरीने बांधलेल्या स्थितीमध्ये असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पोलीस पाटील कळस्कर यांनी याबाबतची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा केला. हा मृतदेह वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या महिलेचा असून त्या मृतदेहावर काळ्या रंगाची पॅन्ट व गुलाबी रंगाचे टी-शर्ट आहे. याबाबत पोलिसांनी पंचक्रोशीमध्ये विचारपूस केली असता, तो मृतदेह कोणीच्याही ओळखीचा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोणीतरी त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह फलटण तालुक्यात आणून विहिरीत टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याबाबत सोलापूर, पुणे जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या महिलांबाबत माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी निंबळक गावचे पोलीस पाटील समाधान महादेव कळसकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करीत आहेत.

Web Title: He killed a woman in Nimbalak and threw her body in a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.