भाऊबीजेसाठी तो १७ किलोमीटर धावत आला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:53 AM2018-11-10T06:53:55+5:302018-11-10T06:54:09+5:30
व्यायामाचा संदेश देत सहायक फौजदार वसंत साबळे यांनी तब्बल १७ किलोमीटर धावत जाऊन बहिणीला अनोखी भाऊबीज दिली.
सातारा : व्यायामाचा संदेश देत सहायक फौजदार वसंत साबळे यांनी तब्बल १७ किलोमीटर धावत जाऊन बहिणीला अनोखी भाऊबीज दिली. वडूथ (ता. सातारा) येथे राहणारे व कोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार वसंत साबळे हे उत्कृष्ट धावपटू, जलतरणपटू, व्हॉलीबॉल, कबड्डी खेळाडू आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मैदाने गाजविली आहेत.
जिल्हा पोलीस दलातर्फे अनेकवेळा त्यांना गौरविण्यातही आले आहे. शुक्रवारी भाऊबीज असल्याने त्यांना ही भन्नाट कल्पना सुचली.
त्यांची बहीण शारदा नवलू सावंत या कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे राहतात. आपल्या बहिणीला तिच्या घरापर्यंत धावत जाऊन भाऊबीज द्यायची. मात्र, तिला याची कल्पना द्यायची नाही, असा निश्चय त्यांनी केला. आपण तुझ्यासाठी आणि आपल्या समाजाला आरोग्य
जपण्याचा संदेश देण्यासाठी घरापासून धावत आल्याचे सांगताच बहिणीने भावाला मिठी मारून कौतुक केले. त्यानंतर भाऊबीज कार्यक्रम पार पडला. ही अनोखी भाऊबीज पाहण्यासाठी परिसरातील नागरिक बहिणीच्या घरी जमा झाले होते.