Satara: भरधाव दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; एक ठार, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 12:21 PM2023-12-15T12:21:07+5:302023-12-15T12:21:42+5:30

सातारा: येथील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसमोर भरधाव दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक तरुण ठार, तर ...

Head-on collision between speeding bikers in Satara; One killed, two injured | Satara: भरधाव दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; एक ठार, दोघे जखमी

Satara: भरधाव दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; एक ठार, दोघे जखमी

सातारा: येथील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसमोर भरधाव दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक तरुण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री अकरा वाजता झाला.

नंदन सुदीप भट्टड (वय २५, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदन भट्टड हा मोळाचा ओढा येथून दुचाकीवरून एकटाच येत होता. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाजवळ तो आला असता समोरून आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नंदन याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. 

तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे तरुणही गंभीररीत्या जखमी झाले. या तिघांनाही तातडीने साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, नंदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ते जखमी दोघेही तरुण अद्यापही बेशुद्ध असून, त्यांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नंदन भट्टड हा कापड व्यावसायिक सुदीप भट्टड यांचा मुलगा होता. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नाही.

Web Title: Head-on collision between speeding bikers in Satara; One killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.