कोरोनाशी लढताना हेडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:10+5:302021-05-01T04:37:10+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक रुग्ण सध्या बेड, व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी जिल्ह्याबरोबरच पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक रुग्ण सध्या बेड, व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी जिल्ह्याबरोबरच पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पळापळ करत आहेत. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता अनेकांचा जीव टांगणीला लावत आहे. तरी लोक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत असून सकाळी अकरानंतर बंदी असताना देखील लोक रस्त्यावर फिरत आहेत. धोक्याची घंटा वाजत असताना देखील लोकांना चिंता नसल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे अनेक गावांमध्ये राजकारण पेटले आहे. काही राजकीय मंडळी या काळातदेखील कुरघोड्या करताना दिसत आहेत. गावाबाहेरून येणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्याला काही लक्षणे दिसत असतील, तर गृहविलगीकरणाचे शिक्के मारणे गरजेचे असतानादेखील अजून अनेक गावांमध्ये अशा पद्धतीने खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांची जिरवण्यासाठी काही विरोधकच कोरोनाबाधित यांची माहिती लपवून ठेवत आहेत.