कासला जाताना दिवसा लावावी हेडलाईट , धुक्याचा परिणाम : वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 08:39 PM2018-06-28T20:39:48+5:302018-06-28T20:39:54+5:30

जागतिक वारसास्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे कास पठार जिल्'ातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात आहे. या परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे.

Headlights for the daytime driving, the result of fog: Driving workout | कासला जाताना दिवसा लावावी हेडलाईट , धुक्याचा परिणाम : वाहनचालकांची कसरत

कासला जाताना दिवसा लावावी हेडलाईट , धुक्याचा परिणाम : वाहनचालकांची कसरत

Next

पेट्री : जागतिक वारसास्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे कास पठार जिल्'ातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात आहे. या परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे. तसेच सध्या शहराच्या पश्चिमेस दिवसभर दाट धुके पसरत असून, समोरून आलेली वाहने दिसत नसल्याने आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे ना ? हे पाहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अपघात टाळता येणे सोपे आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेस सातासमुद्रापार ओळख असणारे कास पठार, भारतातील सर्वाधिक उंचीचा ओळखला जाणारा वजराई धबधबा, अन्य इतर कोसळणारे धबधबे, दाट धुक्यात हरवून जाणारा कास तलाव तसेच कास बामणोली परिसरातील मनाला मोहिनी घालणारे सर्वत्र निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. तसेच शनिवार, रविवारी शेकडो वाहनांच्या रांगा या परिसरात दिसतात. सातारा-बामणोली मार्गावर ठिकठिकाणी धोकादायक वळणे असून, सध्या परिसरात दाट धुक्याच्या दुलईसह मुसळधार पाऊस पडतो.

दिवसभर असणाऱ्या या दाट धुक्यात समोरून येणाºया वाहनांचा अंदाज यावा, यासाठी पर्यटकांनी आपल्या वाहनांची हेडलाईट सुरू करण्यासंदर्भात सावधान असणे अत्यावश्यक आहे. कारण कित्येकदा वाहनांची हेडलाईट सुरू नसल्याने समोरून येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होऊन एखादी विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरात फिरायला येणाºयांनी आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे की नाही, याची तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

बºयाचदा हेडलाईट सुरू नसल्याने दुसरे एखादे वाहन अगदी जवळ आल्यावर समजते. तेव्हा वाहनांवर नियत्रंण ठेवणे अवघड जाते. तसेच ऐनवेळी हेडलाईट सुरू असण्याअभावी समोरून आलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घ्यावे तर रस्त्यालगत लाल मातीवरून वाहन घसरण्याची अधिक शक्यता आहे. तसेच परिसरातील शेतकरी वर्गाची रस्त्यावरून सतत ये-जा सुरू असल्याने वाहन दिसले जावे, यासाठी हेडलाईट सुरू असणे गरजेचे आहे.

पोलिसांची हवी करडी नजर !
सध्या कास पठार परिसरात फिरायला येणाºयांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिवसभर पावसाची रिमझिम त्यात दाट धुक्याची दुलई पाहता दूरवरून समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यात स्टंट अथवा हुल्लडबाजी करणाºयांकडून मोठ्या वेगाने वाहने चालविली जात असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यांच्यावर पोलिसांची कायमस्वरूपी करडी नजर असणे अत्यावश्यक आहे.

अशी घ्यावी काळजी !
- वाहनाचा वेग कमी असावा.
- हेडलाईट सुरू ठेवूनच वाहने चालवावीत.
-वाहनाचे वळण घेतेसमयी इंडिकेटर सुरू असावेत.
- वेळप्रसंगी दाट धुक्यातून वाहन चालविताना पार्किंगलाईट सुरू असावी.
- अधीमधी वाहने रस्त्यावर उभी करू नये. वेळप्रसंगी गरज भासल्यास पुष्कळ जागा पाहून गाडी रस्ता सोडून बाजूला पार्क करावी.


आपल्या चुकीमुळे समोरून येणाºया वाहनाला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये, तसेच भविष्यात दुर्दैवी घटना टाळावी, यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी दाट धुक्यातून प्रवास करताना आपापल्या वाहनांची हेडलाईट दिवसादेखील चालू ठेवणे आवश्यक आहे. सातारा कास मार्ग वळणावळणाचा व घाट रस्ता असल्याने दिवसा तसेच रात्रीदेखील रस्ता दिसला जावा, यासाठी जिलेटीनचा पिवळा कागद हेडलाईटला लावून गडद पिवळा उजेड पडून रस्ता स्पष्ट दिसण्यास मदत होते.
-ओंकार मोहिते, पर्यटक, ठाणे

 

 

Web Title: Headlights for the daytime driving, the result of fog: Driving workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.