जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:48 AM2019-07-03T11:48:35+5:302019-07-03T11:49:50+5:30

शाळेतील विद्यार्थ्याला हीन वागणूक देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्मला कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका व वर्ग शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

Headmistress, teacher educated in connection with caste abuse | जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षा

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देजातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षासातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : शाळेतील विद्यार्थ्याला हीन वागणूक देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्मला कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका व वर्ग शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, तृप्ती सुशील कंठ यांचा मुलगा रुद्राय हा निर्मला कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होता. त्यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) यांनी रुद्राय याला तू झोपडपट्टीमध्ये राहतोस. तुझी या शाळेत शिक्षण घेण्याची लायकी नाही. तुझ्या लायकीच्या झोपडपट्टीच्या शाळा शोध, असे सांगत होत्या. तसेच वर्गामध्ये बाकावर न बसविता खाली जमिनीवर बसवितात. त्याचबरोबर वर्गाबाहेर काढले जाते. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनासोबत बोलणी केली असता प्रशासनाने जातिवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील एम. यू. शिंदे यांनी सरकारी बाजू मांडली.

सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश (एक) ए. ए. जे. खान यांनी मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गशिक्षिका रुझारिया गेब्रिरील सिल्वेरा (रोझा) यांना दोषी ठरवले. त्यांना सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस प्रोसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कबुले, राजेंद्र भूतकर, उर्मिला घाडगे, अविनाश पवार, रवी जाधव, अजित शिंदे, क्रांती निकम यांनी सहकार्य केले.

Web Title: Headmistress, teacher educated in connection with caste abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.