आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:30+5:302021-04-15T04:38:30+5:30
चाफळ : चाफळ विभागात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी कंबर कसली आहे. विविध उपाययोजना राबवत ग्रामस्थांची काळजी घेतली जात आहे, ...
चाफळ : चाफळ विभागात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी कंबर कसली आहे. विविध उपाययोजना राबवत ग्रामस्थांची काळजी घेतली जात आहे, तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून गावोगावी आरोग्य तपासणी केली जात आहे.
सिंदळ ओढ्यात कचरा
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत असणाऱ्या सिंदळ ओढ्यात विद्यानगर परिसरातील व्यावसायिक, दुकानदार टाकाऊ कचरा टाकत असल्यामुळे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा टाकू नये, असे कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीने सांगूनही वेळोवेळी रात्रीचा कचरा टाकला जात आहे. यापुढे कचरा टाकणाऱ्यांवर पाळत ठेवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
मलकापूर : उपमार्गासह कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या गटाराची साफसफाई न केल्यामुळे व खुल्या प्लॉटमधे वाढलेल्या गवत आणि झुडपांमुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे रोगराईत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. अशा खुल्या जागेत कचऱ्याचे ढीग पडत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
बिबट्याचा वावर (०७इन्फोबॉक्स०२)
पाटण : तालुक्यातील मोरणा विभागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग ही सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहेत. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.