वाई एमआयडीसी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:35 PM2017-09-16T12:35:30+5:302017-09-16T12:36:50+5:30
वाई एमआयडीसी परिसरात रस्त्यावरच कचºयाचे डंपिंग केल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, परिसरात कचरा डेपो असूनही एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांकडे जाणाºया रस्त्यावरच कचरा टाकल्याने काही रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.
वाई : वाई एमआयडीसी परिसरात रस्त्यावरच कचºयाचे डंपिंग केल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, परिसरात कचरा डेपो असूनही एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांकडे जाणाºया रस्त्यावरच कचरा टाकल्याने काही रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.
वाई एमआयडीसीकडे जाणाºया मुख्य स्त्यालगतच शहरातील कचरा डंपिंग केला जात असून, यामध्ये अक्षरश: मृत जनावरेही टाकलेली आहेत, त्यामुळे पादचाºयांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
वाई एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या असून, तालुक्याच्या कानाकोपºयातील चाकरमानी येथे स्थायिक झाले आहेत. तसेच प्रसिद्ध श्री क्षेत्र काळूबाई मांढरदेवीकडे जाण्यासाठीही हाच मुख्य मार्ग आहे. त्यामुळे भाविकांचीही वर्दळ येथे असते. त्यामुळे या घाणीतून त्याचीही सुटका नाही.
वाई नगरपरिषदेकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. कचºयाची समस्या लवकर दूर करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.