तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:08+5:302021-05-25T04:44:08+5:30

सातारा : तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तशी ...

Health system should be ready for the third wave: Guardian Minister | तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : पालकमंत्री

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : पालकमंत्री

Next

सातारा : तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तशी तयारी करावी. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहावे. तसेच ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांचा घाबरून हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग झाल्यास न घाबरता वेळेत औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचे शेती विद्युत पंप वीज कनेक्शन प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीज कनेक्शन द्यावे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा करावा. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे, या अनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.

खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.

जिल्हा अग्रणी बँकेने तयार केलेल्या ९ हजार २७५ कोटींच्या वार्षिक पतआराखडा पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Health system should be ready for the third wave: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.