Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:22 AM2024-04-13T08:22:00+5:302024-04-13T08:22:20+5:30
Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ सातारा शहरातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते
सातारा : मराठीसह तेरा भाषांमध्ये अभिनय करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर शुक्रवारी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सोमनाथ सावळे यांनी सांगितले.
सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ सातारा शहरातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सयाजी शिंदे यांना मागील काही दिवसांपूर्वी अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन नियमित चेकअप करून काही तपासण्या करून घेतल्या होत्या. तेव्हा त्यांची पुढील तपासणी करण्यात आली. यामध्ये छातीच्या छोट्याशा भागात हालचाल मंदावल्याने जाणवले होते. त्यांची हृदयाच्या तीन पैकी एका रक्त वाहिनीमध्ये अडथळा जाणवला. उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीच्या तोंडाला ९९ टक्के ब्लॉकेज होते. आता यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील दोन दिवसांमध्ये त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी दिली.