वाईच्या तरुणाचं हृदय मुंबईत धडधडलं !

By admin | Published: May 14, 2016 12:32 AM2016-05-14T00:32:54+5:302016-05-14T00:38:05+5:30

अपघाती मृत्यूनंतर अवयव दान : १४ वर्षीय मुलाचा वाचला जीव

The heart of the young man stuck in Mumbai! | वाईच्या तरुणाचं हृदय मुंबईत धडधडलं !

वाईच्या तरुणाचं हृदय मुंबईत धडधडलं !

Next

वाई : वाईच्या एका व्यापाऱ्याचा एकुलता एक कर्ता-करविता मुलगा गाडीवरून पडल्याचं निमित्त झालं. डोक्याला मार लागल्यामुळे तो थेट कोमात गेला. पुण्याच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, ‘पेशंट जगणं अवघड आहे.’ तेव्हा काळजावर दगड ठेवून त्याच्या आईनं निर्णय दिला, ‘ माझ्या मुलाचं हृदय, लिव्हर, किडनी, हात अन् डोळे दान करा !’... त्याच्या मृत्यूनंतर हृदय काढून तत्काळ मुंबईला पाठविण्यात आलं. तिथं १४ वर्षांच्या मुलाला हे हृदय रोपण करून त्याचा जीव वाचविला गेला.
या हृदयद्रावक घटनेची माहिती अशी की, वाई येथील व्यापारी चंपालाल ओसवाल यांचा मुलगा मनीष (वय ३०) हा मंगळवारी रात्री दुचाकी घसरल्याने जखमी झाला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने सुरुवातीला साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, दान केलेले सर्व अवयवांचे त्वरित प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे संबंधितांना अपंगत्वावर मात करणे शक्य झाले आहे. नातेवाइकांनी व रुबी हॉलच्या व्यवस्थापनाने ओसवाल कुटुंबीयांचे आभार मानले. दु:खद घटना होऊनही ओसवाल कुटुंबीयांनी समाजाप्रती तळमळ दाखविली. पार्थिवावर मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व आठ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The heart of the young man stuck in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.