हार्टकेअर सेंटर ग्रामीण भागासाठी वरदान : देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:17+5:302021-09-26T04:42:17+5:30

खंडाळा : ‘खंडाळा तालुक्यात सर्व सुविधांयुक्त हार्ट केअर सेंटर उभे राहिले हे महत्त्वाचे आहे. येथे महात्मा फुले जनआरोग्य योजना ...

Heartcare Center a boon for rural areas: Desai | हार्टकेअर सेंटर ग्रामीण भागासाठी वरदान : देसाई

हार्टकेअर सेंटर ग्रामीण भागासाठी वरदान : देसाई

Next

खंडाळा : ‘खंडाळा तालुक्यात सर्व सुविधांयुक्त हार्ट केअर सेंटर उभे राहिले हे महत्त्वाचे आहे. येथे महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामीण भागासाठी हे हार्टकेअर सेंटर वरदान ठरेल,’ असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

खंडाळा येथील मानसी मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब व हार्टकेअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक मंगेश चिवटे, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, राजाभाऊ भिलारे, प्रदीप माने, शारदा जाधव, तहसीलदार दशरथ काळे, अजित यादव, हरीश पाटणे, राजेश कुंभारदरे, डॉ. मंदार देव, डॉ. सुहास हरदास, चेअरमन डॉ. महेंद्र ढमाळ, डॉ. मनीषा ढमाळ, डॉ. अवधूत ढमाळ उपस्थित होते.

डॉ. ढमाळ म्हणाले, ‘अतिशय नामांकित हृदयरोग तज्ज्ञ येथे रुग्णांवर उपचार करणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याला प्राधान्य असेल.’

मंगेश चिवटे यांचे भाषण झाले. बाबा लिमण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनीषा ढमाळ यांनी आभार मानले. (वा. प्र.)

२५खंडाळा एडीव्हीटी

खंडाळा येथील मानसी मेमोरिअल हॉस्पिटलच्या कॅथलॅब, हार्टकेअर सेंटरचे उद्घाटन शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी मंगेश चिवटे, डॉ. महेंद्र ढमाळ, डॉ. मनीषा ढमाळ, तहसीलदार दशरथ काळे उपस्थित होते.

Web Title: Heartcare Center a boon for rural areas: Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.