पाचगणी परिसरात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:25+5:302021-06-18T04:27:25+5:30

पाचगणी : पाचगणी शहर व परिसरात गुरूवारी सकाळपासून जोरदार स्वरुपात पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले तर ...

Heavy presence of rain in Pachgani area | पाचगणी परिसरात पावसाची जोरदार हजेरी

पाचगणी परिसरात पावसाची जोरदार हजेरी

googlenewsNext

पाचगणी : पाचगणी शहर व परिसरात गुरूवारी सकाळपासून जोरदार स्वरुपात पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

पाचगणी परिसरात तीन दिवसांपासून हलका पाऊस पडत होता. परंतु, बुधवारपासून पावसाने जोर धरला आहे. गुरूवारी सकाळपर्यंत ६४ मिलिमीटर पाऊस पडला. यावर्षी आतापर्यंत ३९७.४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे रस्त्यावर सर्व ठिकाणी पावसाचे पाणी वाहत होते. परिसरात दाट धुके पसरले असल्याने चारचाकी, दुचाकी वाहनधारकांना मार्गक्रमण करणे अवघड जात होते. तसेच पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार तसेच राजपुरी परिसरातही पावसाने जोर धरला आहे. शेतीलाही हा पाऊस पूरक असल्यामुळे बळीराजाही सुखावला आहे.

कोरोनाच्या संकटाने पाचगणीची बाजारपेेठ चार महिने अत्यावश्यक सेवा वगळता बंदच आहे. या दिवसात पाचगणी बाजारपेठेत जलधारा अंगावर झेलत हिरव्या गार डोंगररांगांचे नयनमनोहर दृश्य टिपण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पण कोरोना परिस्थिती, जिल्हा बंदी यामुळे पर्यटकांना पाचगणीचे दरवाजे मार्चपासूनच बंद आहेत. त्यामुळे पर्यटकांविना बाजारपेठ सुनसान दिसत आहे.

फोटो आहे...

Web Title: Heavy presence of rain in Pachgani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.