सातारा: अतिवृष्टीमुळे दांडेघर येथील डोंगराला पडल्या मोठ्या भेगा, शेजारील शाळेच्या इमारतीला धोका

By दीपक शिंदे | Published: July 21, 2022 12:30 PM2022-07-21T12:30:50+5:302022-07-21T12:36:18+5:30

महसूल विभागाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे दिले आदेश

Heavy rain caused huge cracks in the mountain at Dandeghar in Mahabaleshwar taluka | सातारा: अतिवृष्टीमुळे दांडेघर येथील डोंगराला पडल्या मोठ्या भेगा, शेजारील शाळेच्या इमारतीला धोका

सातारा: अतिवृष्टीमुळे दांडेघर येथील डोंगराला पडल्या मोठ्या भेगा, शेजारील शाळेच्या इमारतीला धोका

Next

पाचगणी : अतिवृष्टीमुळे दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे डोंगरा शेजारी असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे असे आदेश तातडीने दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की पाचगणी पासून  केवळ एक किलोमीटर वर असणाऱ्या दांडेघर हद्दीत असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीच्या बाजूला असणारा सर्व्हे नंबर २३ / ६ हा डोंगर अतिवृष्टीने सुमारे अडीच फूट खाली खचला. डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.

तलाठी  दीपक पाटील, निलेश गीते व उपसरपंच जनार्दन कळंबे, अशोक कासूर्डे यांचे उपस्थितीत हा पंचनामा केला. यावेळी येथील परिस्थीतीची पाहणी करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक क्षेत्रात असणाऱ्या शाळेच्या इमारतीला धोका असल्याने अधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांना तातडीने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दांडेघर येथील डोंगर पावसाने खचला असल्याचे उपसरपंच जनार्दन कळंबे यांच्या निदर्शनास आल्याने सर्वांना बोलावून पंचनामा केला आहे.  या भेगांमुळे शाळेच्या लागत असणारी दरड पाण्याच्या टाक्या जवळ आली आहे. तर एक वृक्ष ही यामध्ये उन्मळून पडला आहे.

Web Title: Heavy rain caused huge cracks in the mountain at Dandeghar in Mahabaleshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.