सातारा: पाचगणीत ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यावर नदीचे स्वरूप; नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:35 PM2022-07-29T12:35:16+5:302022-07-29T12:36:22+5:30

संपूर्ण रस्ते जलमय

Heavy rain in Panchgani, The nature of the river on the road | सातारा: पाचगणीत ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यावर नदीचे स्वरूप; नागरिकांची उडाली तारांबळ

सातारा: पाचगणीत ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यावर नदीचे स्वरूप; नागरिकांची उडाली तारांबळ

googlenewsNext

दिलीप पाडळे

पाचगणी :  गेल्या दोन दिवसापासून वातावरणात अचानक बदल झाला असून आकाश निरभ्र होवून सध्यांकाळी आकाशात ढगांची दाटी होतेय. तर दिवसभर उष्णता जावणवतेय. मात्र, पाचगणीमध्ये काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे बिलीमोरिया रस्त्यावर पाण्याचे लोट वाहिल्याने नदीचे स्वरूप आले होत. हे पाणी अनेकांच्या दुकानात घुसल्याने व्यावसायिकांनी तारांबळ उडाली होती.

पाचगणीत काल, गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे टेबल पठारावरून पाण्याचे लोट वाहत होते. तर, संपूर्ण रस्ते जलमय झाले होते. हे पाणी बिलिमोरीया रस्त्यावर असणाऱ्या अनेक दुकानामध्ये शिरले. दुकानातून पाणी बाहेर काढण्याकरीता व्यावसायिकांना कसरत करावी लागली.

पाण्याची समस्या नित्याची

पाचगणी मध्ये टेबल पठारावरून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याची समस्या नित्याची आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या पाऊसात बिलीमोरीया रस्त्यावर अनेकदा पाणी येते. हे पाणी दुकानामध्ये शिरतेच तर नगरपरिषदेच्या माध्यमातून या येणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्याचे सुरूच आहे. त्याकरिता भूमिगत पाईप टाकण्यात काम सद्य परिस्थितीमध्ये सुरू आहे.

Web Title: Heavy rain in Panchgani, The nature of the river on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.