कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर मूसळधार पाऊस, पाणीसाठा ५२ टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:26 AM2022-07-16T11:26:54+5:302022-07-16T11:27:21+5:30

मूसळधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Heavy rain overnight in Koyna Dam area, water storage at 52 TMC | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर मूसळधार पाऊस, पाणीसाठा ५२ टीएमसीवर

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर मूसळधार पाऊस, पाणीसाठा ५२ टीएमसीवर

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून  ओळख असलेले कोयना धरण शनिवारी अर्धे भरले आहे. पाणलोट क्षेत्रात काल, शुक्रवारी सायंकाळपासून रात्रभर पडत असलेल्या मूसळधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात 61 हजार 108 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आज, शनिवारी सकाळपर्यंत धरणात ५२.१५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान कोयना येथे 153, नवजा येथे 162 तर महाबळेश्वर येथे 178 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून 2100 क्युसेक पाण्याचा  विसर्ग सुरूच आहे. धरणात सकाळी आठ वाजेपर्यंत 52.15 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 49.55 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात धरणात 5.10 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

दरम्यान आज शनिवारी घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून उद्या, रविवारी सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे.

कोयना धरण पाणीसाठा

एकूण पाणीसाठा-52.15 टीएमसी,
उपयुक्त पाणीसाठा-47.03 टीएमसी,
आजच्या दिवशी गतवर्षी धरणात 47.20 टीएमसी पाणीसाठा होता.

Read in English

Web Title: Heavy rain overnight in Koyna Dam area, water storage at 52 TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.