महिन्यानंतर पश्चिमेकडे जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 12:15 PM2020-08-04T12:15:28+5:302020-08-04T12:21:05+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने कोयना धरणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा २४ तासांत दीड टीएमसीवर वाढला. तर मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १७५, महाबळेश्वर १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटर पाऊस पडला.

Heavy rain to the west after months | महिन्यानंतर पश्चिमेकडे जोरदार पाऊस

महिन्यानंतर पश्चिमेकडे जोरदार पाऊस

Next
ठळक मुद्देकोयनेत दीड टीएमसीवर वाढ महाबळेश्वरला १८१ तर नवजाला १९१ मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने कोयना धरणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा २४ तासांत दीड टीएमसीवर वाढला. तर मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १७५, महाबळेश्वर १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटर पाऊस पडला.

पश्चिम भागातील कोयनानगर, नवजा, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर या भागात सोमवारपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७५ मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटरची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे.

मंगळवारी सकाळी धरणात ६०७१ क्यूसेक वेगोन पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ५४.२० टीएमसी झाला होता. तर सोमवारी सकाळीच हा साठा ५२.५१ टीएमसी इतका होता. म्हणजे २४ तासांत कोयनेतील साठा १.६९ टीएमसीने साठा वाढला. तर धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

जवळपास एक महिन्यानंतर पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणातील साठ्यात झपाट्याने वाढ होऊ शकते.

 

Web Title: Heavy rain to the west after months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.