सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर पाऊस

By नितीन काळेल | Published: October 2, 2023 02:06 PM2023-10-02T14:06:25+5:302023-10-02T14:06:46+5:30

यावर्षी मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात

Heavy rainfall in Satara district, 64 mm rain in Mahabaleshwar | सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर पाऊस

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर पाऊस

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असून पश्चिम भागातही हजेरी लावत आहे. त्यामुळे २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची महाबळेश्वरला ६४ मिलीमीटरची झाली आहे. तर नवजालाही चांगला पाऊस झाला. कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा ९३ टीएमसीवर गेला आहे.

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात झाली. जून महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर जुलै महिन्यापर्यंत होता. यामुळे पश्चिम भागात धुवांधार पावसाने दाणादाण उडवून दिली.  त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसह कोयना धरणात चांगला पाणीसाठा झाला. पण, ऑगस्स्ट महिना उजाडल्यानंतर दोन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे बलकवडी आणि तारळी वगळता इतर धरणांत कमी पाणीसाठा राहिला. सध्या तर परतीचा पाऊस सुरू झाल्याने प्रमुख धरणे भरण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण, उरमोडी धरणात ६० टक्केही पाणीसाठा नाही.  या धरणातील पाण्यावर माण, खटाव या दुष्काळी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या परतीचा पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम भागातील कास, बामणोली, कोयनानगर, नवजा, तापोळा आणि कांदाटी खोऱ्यात  पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर झाला. तर कोयनानगर येथे २८ आणि नवजाला ३७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५६१४ मिलीमीटर पडलेला आहे. तसेच कोयनेला ३९९३ आणि महाबळेश्वरला ५४४८ मिलीमीटर झाला आहे. तर सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५२३१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.  धरण पाणीसाठा ९३.७७ टीएमसी झाला होता. तरीही धरण भरण्यासाठी ११  टीएमसीवर पाण्याची गरज आहे.

Web Title: Heavy rainfall in Satara district, 64 mm rain in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.