कºहाड, ढेबेवाडीला पावसाने झोडपले
By admin | Published: May 21, 2014 01:01 AM2014-05-21T01:01:08+5:302014-05-21T17:36:45+5:30
डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली : कºहाड, पाटण, फलटण, खटाव, वाई तालुक्यांत वादळी पाऊस
सातारा : जिल्ह्यातील कºहाड, पाटण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यांत आज, मंगळवारी सायंकाळी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर सोसाट्याच्या वार्याला सुरुवात झाली. त्यानंतर कºहाड, पाटण, पुसेगाव, पुसेसावळी परिसरांत चांगला पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. ग्रामस्थांनी ही झाडे हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. ढेबेवाडी परिसरात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाई तालुक्यातील कवठे परिसरालाही पावसाने झोडपून काढले. कºहाड शहरात ठिकठिकाणी उभारलेले बॅनर कोसळले. तसेच प्रीतिसंगम बागेत काही झाडे मोडून पडली. खेळण्यांचेही नुकसान झाले. परिसरातील काही घरांवरील पत्रे उडाले. तांबवे भागाला वादळी वार्याचा मोठा फटका बसला. घर, जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून गेले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. डेळेवाडी येथील खिंडीत दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. अंबवडे येथील घरावरील पत्रा पखाड्यांसह उडून काही अंतरावरील झाडावर जाऊन पडला. कोळे येथील साई वीट कारखान्यात काम करणार्या मजुरांच्या सहा खोल्यांवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसारोपयोगी साहित्य भिजले. वादळी वार्यामुळे ऊस, मका, आदी पिके भुुईसपाट झाली. ढेबेवाडी परिसरात सायंकाळी वादळी वार्याने थैमान घातले. (प्रतिनिधी)