सातारा शहरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली धांदल; गणेश मंडळाच्या भव्य-दिव्य देखाव्याचे नुकसान

By सचिन काकडे | Published: September 26, 2023 03:26 PM2023-09-26T15:26:03+5:302023-09-26T17:01:21+5:30

गणेश मंडळाकडून उभारण्यात आलेले भव्य-दिव्य देखाव्याचे नुकसान झाले

Heavy rains in Satara city, Roads were flooded | सातारा शहरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली धांदल; गणेश मंडळाच्या भव्य-दिव्य देखाव्याचे नुकसान

सातारा शहरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली धांदल; गणेश मंडळाच्या भव्य-दिव्य देखाव्याचे नुकसान

googlenewsNext

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरूणराजाने आज, मंगळवारी दुपारी सातारा शहर व परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले तर विक्रेते व खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी बारानंतर पावसाचा एक- दोन सरी बरसल्या. यानंतर पावसाने उघडीत दिली. मात्र, दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली. विजेचा कडकडाट व वेगवान वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. गणेश मंडळाकडून उभारण्यात आलेले भव्य-दिव्य देखावे देखील या पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे.

Web Title: Heavy rains in Satara city, Roads were flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.