पावसाचा जोर वाढला, कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:33 PM2023-06-27T12:33:03+5:302023-06-27T12:33:26+5:30

दि. २१ रोजी पाणी आवर्तन संपल्याने कोयना धरणातून पूर्ण विसर्ग बंद करण्यात आला होता

Heavy rains increased, release from Koyna Dam started again | पावसाचा जोर वाढला, कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

पावसाचा जोर वाढला, कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

googlenewsNext

कोयनानगर : कोयना धरणाच्या पायथा वीजगृह सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दोन जनित्रातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.

गत चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस जोर वाढत आहे. यामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा १०.९५ टीएमसी इतका झाला आहे. बुधवार, दि. २१ रोजी पाणी आवर्तन संपल्याने कोयना धरणातून पूर्ण विसर्ग बंद करण्यात आला होता. सोमवारी सकाळी पुन्हा धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन जनित्र सुरू करत २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी झालेल्या पडलेल्या व कंसात आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे : कोयना ५६/२३६, नवजा ५६/२६६, महाबळेश्वर ९४/३६८ मिलीमीटर.

Web Title: Heavy rains increased, release from Koyna Dam started again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.