खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं वाटेतच बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 01:02 PM2023-12-23T13:02:39+5:302023-12-23T13:02:57+5:30

पुणे ते सातारा जाण्यासाठी खंबाटकी घाटातून प्रवास करावा लागतो. यावेळी जवळपास २-३ किमी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

Heavy traffic jam at Khambataki Ghat; Many vehicles stopped on the way due to engine overheating | खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं वाटेतच बंद

खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं वाटेतच बंद

सातारा - सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत आहेत. परंतु महाबळेश्वर आणि पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही कुठे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकेंडसाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्ग सोयीचा राहतो. त्यामुळे या महामार्गावरून जास्त वाहनांची रेलचेल असते. त्यात खंबाटकी घाटात झालेल्या कोंडीचा फटका वाहनचालकांना बसला आहे.

पुणे ते सातारा जाण्यासाठी खंबाटकी घाटातून प्रवास करावा लागतो. यावेळी जवळपास २-३ किमी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यात वाहनांचे इंजिन गरम झाल्याने याठिकाणी २०० पेक्षा जास्त वाहने घाटातच बंद पडली आहे. त्यामुळे वाहन चालकांची पंचाईत झाली आहे. नाताळच्या सुट्ट्या असल्याने बऱ्याच जणांनी बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग केले आहे. गोवा, महाबळेश्वर यासारख्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी मुंबई-पुणे येथील लोक या महामार्गाचा वापर करतात. त्याचाच परिणाम आज झालेल्या वाहतूक कोंडीत पाहायला मिळत आहे. 

पारगाव खंडाळ्यापासून हा घाट सुरू होतो. याठिकाणी घाटात अनेक वाहने इंजिन गरम झाल्याने बंद पडली आहेत. या परिस्थितीमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची रुंदी वाढवावी यासाठी वारंवार मागणी होते. परंतु प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नाही.त्याचेच हे चित्र खंबाटकी घाटात पाहायला मिळत आहे. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आणि बंद पडलेली वाहने यामुळे याठिकाणाहून पर्यायी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी यासाठी पोलीस प्रशासन हालचाली करत आहे. 
 

Web Title: Heavy traffic jam at Khambataki Ghat; Many vehicles stopped on the way due to engine overheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.