अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नवीन रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:49+5:302021-02-16T04:39:49+5:30

मलटण : गेली दोन वर्षे भुयारी गटार योजनेमुळे रस्ते खोदल्यामुळे फलटण तसेच उपनगरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मलटणमधील नागरिकांना ...

Heavy vehicle traffic paved a new road | अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नवीन रस्ता उखडला

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नवीन रस्ता उखडला

Next

मलटण : गेली दोन वर्षे भुयारी गटार योजनेमुळे रस्ते खोदल्यामुळे फलटण तसेच उपनगरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मलटणमधील नागरिकांना दिलासा म्हणून संतोषी माता मंदिर ते गणदास रस्ता व जिजाई चौक ते अडसूळ कॉलनी हे रस्ते नव्याने खडीकरण व डांबरीकरण होत आहेत. यापैकी गनदास रस्त्यावर एका खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीसाठी मोठ्या व अवजड वाहनांतून खडी, वाळू तसेच इतर बांधकाम साहित्य येते. यामुळे नवीन खडीकरण व डांबरीकरण केलेले रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला आहे आणि या होणाऱ्या वाहतुकीमुळे तो अजूनही उखडला जात आहे. याच इमारतीसाठी मलटणमधील अन्य मार्गांनीदेखील मालवाहतूक केली जाते. यामध्ये भुयारी गटार योजनेतील अनेक चेंबर फुटल्याचे नागरिक सांगतात. रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक केल्याने जमिनीत कंप निर्माण होऊन जुन्या व कच्च्या घरांना तडे गेल्याचे प्रकार घडले आहेत. तरी येथील नागरिकांनी फलटण पालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे, तरीही याठिकाणी या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून, रस्ता उखडला जात आहे.

नागरिकांनी वेळोवेळी विनंती आणि समज देऊनही बांधकाम व्यावसायिकांकडून रस्ता खराब होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित कारवाही करून रस्ता खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

१५मलटण

फलटण आणि उपनगरामध्ये नवीन खडीकरण व डांबरीकरण केलेले रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला आहे.

Web Title: Heavy vehicle traffic paved a new road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.