अपघातात मृत्यू पावलेल्या मित्राच्या स्मृतिदिनी हेल्मेट वाटप

By admin | Published: September 20, 2015 09:03 PM2015-09-20T21:03:02+5:302015-09-20T23:43:02+5:30

शेंद्रे : अजिंक्य तरुण मंडळ, शिवसमर्थ संस्थेचा सामाजिक उपक्रम

Helmet distribution during a friend's death in the accident | अपघातात मृत्यू पावलेल्या मित्राच्या स्मृतिदिनी हेल्मेट वाटप

अपघातात मृत्यू पावलेल्या मित्राच्या स्मृतिदिनी हेल्मेट वाटप

Next

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात जिवलग मित्र गमावला. तो गेल्याचं दु:ख होतंच पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्याने हेल्मेटचा वापर केला असता तर जीव वाचला असते. मित्राने केलेली चूक इतरांकडून घडू नये, या अपघातातून हा धडा घेऊन शेंद्र येथील काही मित्रांनी हेल्मेटचे वाटप वाहून मित्राला अभिवादन केले. शेंद्रे येथील युवक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांच्या स्मरणार्थ गावातील अजिंक्य तरुण मंडळ आणि शिवसमर्थ सामाजिक संस्था यांच्यावतीने हेल्मेट वाटप करुन गायकवाड यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला.गेल्यावर्षी महामार्गावर दुचाकी अपघातात गणेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. हेल्मेट घातले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, असे अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्ती व जाणकारांनी सांगितले होते. त्यातून अधिक विचाराअंती दिवंगत गायकवाड यांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी त्यांच्या स्मृतिदिनी स्वखर्चाने मोफत हेल्मेट वाटप केले.राजवाडा बसस्थानकासह, पोवई नाका, विसावा नाका, शाहूपुरी चौक, शाहूनगर, गोडोली, कोडोली आदी प्रमुख वर्दळीच्या एकूण वीस ठिकाणी हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कबड्डी महर्षी विजय जाधव, नगरसेवक रामभाऊ संकपाळ, शहर वाहतूक शाखेचे सुभाष अंबवले, जितेंद्र जाधव, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक ज्ञानेश्वर कांबळे, कवी प्रदीप कांबळे, शिवप्रेमी युवा संघटनेचे किसनराव मराठे, गजेंद्र ढोणे, जयप्रकाश इंगळे, मुकुंद पोतदार, विजय पडवळ, विजय रसाळ आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढे कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट वापरुनच मोटारसायकल चालविण्याची शपथ काही मित्रांनी घेतली. या उपक्रमाचे सातारा शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक केले असून हेल्मेट वाटप करण्याचा संकल्प केला आहे.
ज्ञानेश्वर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. जयंत लंगडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Helmet distribution during a friend's death in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.