किवळच्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:09+5:302021-05-06T04:41:09+5:30
मसूर : किवळ (ता. कऱ्हाड) येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी मुख्यमंत्री ...
मसूर : किवळ (ता. कऱ्हाड) येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस २५००० रुपयांचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी निरंजन साळुंखे व रामभाऊ साळुंखे उपस्थित होते.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील जनतेसाठी कोविड लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने मोफत लसीकरणासाठी निधी दिला आहे.
किवळसारख्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या माई चॅरिटेबल ट्रस्टने नेहमीच सामाजिक विचारातून समाजोपयोगी कामासाठी मदत व सहकार्य केले आहे. धारावी मुंबई येथे झोपडपट्टीमध्ये महिलांना व दहावीच्या विद्यार्थ्यांना व शासकीय कार्यालयातील महिलांना योग प्रशिक्षण व समुपदेशन शिबिराचे आयोजन, लेक वाचवा अभियान, महिला बचत गटांची बांधणी, बालवाड्याची निर्मिती, शेतीतील विविध प्रयोग, जलसंधारणाची कामे, नवीन तंत्रज्ञानाद्वारे कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रबोधन, पाचट वाचवा अभियान, महिला सक्षमीकरणाच्या बळकटीसाठी प्रयत्न, पूरस्थितीमध्ये अन्नधान्याची किट पोहोचवण्यासह असे विविध उपक्रम या ट्रस्टने राबविले आहेत.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीस २५००० रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माई चॅरिटेबल ट्रस्ट समाजासाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
०५मसूर
फोटो कॅप्शन- किवळच्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्द करताना संगीता साळुंखे, निरंजन साळुंखे, रामभाऊ साळुंखे, आदी उपस्थित होते.