काडसिद्धेश्वर कोविड सेंटरला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:03+5:302021-05-14T04:38:03+5:30

खटाव : कोरोनाच्या या महामारीत ज्यावेळी खऱ्या अर्थाने लोकांना मदतीची गरज आहे. अशावेळी आमदार महेश शिंदे यांनी स्वतःच्या खर्चातून ...

Help to Kadsiddheshwar Kovid Center | काडसिद्धेश्वर कोविड सेंटरला मदत

काडसिद्धेश्वर कोविड सेंटरला मदत

Next

खटाव : कोरोनाच्या या महामारीत ज्यावेळी खऱ्या अर्थाने लोकांना मदतीची गरज आहे. अशावेळी आमदार महेश शिंदे यांनी स्वतःच्या खर्चातून कोरेगावमध्ये दोनशे बेडचे कोरोना सेंटर सुरू केले आहे. हे चालवत असताना खटावमधून देखील अनेक रुग्ण या कोरोना सेंटरमध्ये दाखल होत आहेत.

या कठीण प्रसंगात कोरोना बाधित रुग्णाला हीन वागणूक देत असताना आमदार महेश शिंदे व त्यांच्या बहीण डॉ. अरुणा बर्गे, पत्नी डॉ. प्रिया शिंदे, मात्र या कोविड सेंटरमध्ये त्यांचे आधारवड बनून त्यांची काळजी घेत आहेत.

आमदार महेश शिंदे यांच्या कार्यात खटावमधील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून आपले देखील थोडेफार योगदान असावे, असे मत पुढे आले. आणि बघता-बघता कोविड सेंटरसाठी खटाव गावातर्फे मदत म्हणून ५५ क्विंटल धान्य तसेच ५० तेलाचे डबे आणि खटावमधील फौजी संघटनेकडून १ लाख ३४ हजारांची रोख रक्कम असे खटाव गावातर्फे आमदार महेश शिंदे यांच्या काडसिद्धेश्वर कोविड सेंटरला मदत करण्यात आली.

१३खटाव

काडसिद्धेश्वर कोविड सेंटरला खटाव ग्रामस्थांच्या वतीने मदत पोहोचवताना याप्रसंगी आमदार महेश शिंदे, राहुल पाटील, अशोक कुदळे, नंदकुमार वायदंडे, अमर देशमुख व ग्रामस्थ, फौजी संघटनेतील सदस्य उपस्थित होते.

Web Title: Help to Kadsiddheshwar Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.