पोलिसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:24+5:302021-05-04T04:18:24+5:30
कऱ्हाड : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी चोवीस तास सेवा बजावणाऱ्या पोलिसांना भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड ...
कऱ्हाड : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी चोवीस तास सेवा बजावणाऱ्या पोलिसांना भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड दक्षिण विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने साहित्य वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष राजवर्धन पाटील, विनायक कोंढाळकर, रणजीतसिंह पाटील, मिहीर शहा, वैष्णव लिमये, यश सोळंकी, प्रसाद कलबुर्गी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
ढेबेवाडीत रक्तदान
ढेबेवाडी : ढेबेवाडी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व महालक्ष्मी ब्लड बँकेतर्फे घेण्यात आलेल्या शिबिरात ६८ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तालुका संघचालक श्रीरंग कुंभार, कार्यवाहक, उदय साळुंखे, जिल्हा प्रचारक सुजित घमंडे हे उपस्थित होते. डॉक्टर, रुग्णवाहिका चालक आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
औषध फवारणी
कऱ्हाड : गोवारे (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गावात औषध फवारणी सुरू केली आहे. कोरोनाचे संकट टळेपर्यंत ग्रामपंचायत हद्दीत औषध फवारणी सुरू राहणार असल्याचे सरपंच वैभव बोराटे यांनी सांगितले. उपसरपंच विजय पाटील, स्वानंद माळी, मिनाक्षी कदम, ज्योती गुरव, श्रावण माने उपस्थित होते.
कोरोना लसीकरण
तांबवे : येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण सुरू असतानाच वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने उपस्थितांची तारांबळ उडाली. मात्र, तरीही ग्रामपंचायतीच्यावतीने सुरक्षेच्या उपाययोजना करून लसीकरण सुरू ठेवण्यात आले. गटविकास अधिकारी डॉ. बाबासाहेब पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.