कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी मदतगार सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:35 AM2021-05-22T04:35:41+5:302021-05-22T04:35:41+5:30

वरकुटे-मलवडी : कोरोना महामारीने शहरी भागासोबत ग्रामीण भागातही भयंकर रूप धारण केले असताना, सुभाष सातपुते यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ...

Helpers for the treatment of coronary heart disease | कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी मदतगार सरसावले

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी मदतगार सरसावले

Next

वरकुटे-मलवडी : कोरोना महामारीने शहरी भागासोबत ग्रामीण भागातही भयंकर रूप धारण केले असताना, सुभाष सातपुते यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वरकुटे-मलवडीत लोकसहभागातून सुरू असलेल्या संकल्प कोरोना सेंटरला ३५ हजार रुपयांचे ऑक्सिमिटर मशीन, टेंपरेचर मशीन, औषधे, सॅनिटायजर मास्क आदी साहित्य प्रदान करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या इमारतीत सुरू असलेल्या कोविड सेंटरसमोर हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी धीरज जगताप, प्रशांत खरात, माजी सरपंच संजय खिलारी, संजय जगताप, सचिन आटपाडकर, सुधीर विभुते, सुनील थोरात, साहेबराव खरात, सरपंच विजय जगताप, सचिव भागवत अनुसे, विक्रम शिंगाडे, डी. जी. बनगर, पांडुरंग कोडलकर, उपसरपंच सुरेश शिरकांडे, ग्रामसेवक दत्तात्रय गळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी सनदी अधिकारी आणि माण तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख व अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेश फाउंडेशनच्या सहकार्याने व राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस अभय जगताप यांच्या प्रयत्नातून वरकुटे-मलवडीत ६० बेडचे संकल्प कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. याकरिता शिक्षक संघ, सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी व परिसरातील मान्यवर आशा विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून, याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणासह सर्व उपचारांंच्या सुविधा मोफत पुरविण्यात येत आहेत.

Web Title: Helpers for the treatment of coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.