बनघर ग्रामस्थांकडून दुर्गम भागातील सोळा गावांमध्ये मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:14+5:302021-06-30T04:25:14+5:30

सातारा : सातारा येथील ‘एक हात मदतीचा’ या ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम आणि डोंगराळ भागातील लोकांच्यासाठी मदतीचे काम सुरू आहे. ...

A helping hand from Banghar villagers in sixteen remote villages | बनघर ग्रामस्थांकडून दुर्गम भागातील सोळा गावांमध्ये मदतीचा हात

बनघर ग्रामस्थांकडून दुर्गम भागातील सोळा गावांमध्ये मदतीचा हात

Next

सातारा : सातारा येथील ‘एक हात मदतीचा’ या ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम आणि डोंगराळ भागातील लोकांच्यासाठी मदतीचे काम सुरू आहे.

महिनाभर या ग्रुपचे युवक चाळकेवाडी परिसर व कोयना धरण फुगवटा क्षेत्रातील आणि कास-बामणोली, जावळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील १६ गावांतील ४५५ कुटुंबातील लोकांना मदत करीत आहेत.

त्यांनी रविवारी परळीच्या जवळील बनघर गावात जाऊन तेथील गरजू लोकांना किराणा माल आणि भाजीपाला देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथील लोकांना या कोरोनाच्या काळात खूप अडचणी येत असल्याचे समजले. त्यामुळे तेथील लोकांची गरज लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधीलकीची भूमिका घेऊन एक आठवडा पुरेल एवढे अन्न धान्य आणि भाजीपाल्याचे वाटप केले.

या कार्यात प्रसाद खरे, नीशा खरे, सर्वेश चाफेकर, जयश्री पोतदार, प्रथमेश भागवत, महेशकुमार भुते, नंदकुमार पवार, अपूर्व फल्ले, मंगेश मांडवगणे, मयुरी देशपांडे, गणेश वास्के, गायत्री पाटील यांनी मदत केली. हे साहित्य राजेश कानिम, हेमंत लंगडे, धनंजय अवसरे, शैलेश करंदीकर, साहिल व अथर्व अवसरे, ओम डोंगरे, जयदीप ताटके, प्रा. कैलास बागल, अपूर्व फल्ले, प्रतिक साळुंखे, प्रथमेश भागवत, विपुल मेहता, सहायक प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी सहकार्य केले. यावेळी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेची ग्रुपच्या कार्याची माहिती धनंजय अवसरे यांनी दिली.

फोटो

२९बनघर

साताऱ्यातील ‘एक हात मदतीचा’ समूहाच्यावतीने बनघर येथील ग्रामस्थांना मदत पोहोच करण्यात आली.

Web Title: A helping hand from Banghar villagers in sixteen remote villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.