...येथे काळ दबा धरुन बसतो; सातारा जिल्ह्यातील ८४ ठिकाणे अपघाती क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:42 PM2018-12-23T22:42:06+5:302018-12-23T22:42:14+5:30
संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर आणि गुहाघर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेत. त्याचबरोबरच अनेक ...
संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर आणि गुहाघर-विजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेत. त्याचबरोबरच अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्गांनी वाहतुकीचं जाळं विणलंय. दररोज हजारो वाहनांची या रस्त्यांवरून वर्दळ होत असते; पण या प्रवासातच कुठेतरी काळ दबा धरून बसतो. त्यामुळेच वाहनांना अपघाताचा सामना करावा लागतो. या अपघातांना कधी-कधी वेळ कारणीभूत ठरते, तर बहुतांशवेळा ते ठिकाणच अपघाती असतं. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात पाहणी केली आणि जिल्ह्यातील ८४ ठिकाणे अपघाती क्षेत्र म्हणून नोंदवली.
पोलीस ठाण्यांच्या
कार्यक्षेत्रातील अपघाती ठिकाणे
शिरवळ फाटा
शिंदेवाडी फाटा
शिर्के मिल
पारगाव फाटा
खंडाळा फाटा
वेळे खंबाटकी बोगदा
गुळुंब फाटा ४उडतारे
सुरूड फाटा
अनवडी फाटा
भादेवाडी फाटा
कृष्णा पूल
निंभोरे फाटा
सुरवडी फाटा
विडणी चौक
पिंप्रद वळण
नांदोशी
दिवड वनीकरण ४धुळदेव
केरा पूल (जुने बसस्थानक)
येरफळे
पसरणी घाट (रेशीम केंद्र)
नागेवाडी फाटा
लिंब खिंड
म्हसवे शोरूम
आरले गोकूळ ढाबा
कृष्णा पूल
खोंडवे
वाढे
शिवथर थांबा
शेंद्रे फाटा
वाढेफाटा
चाहूर खेड फाटा
अजंठा चौक
शिवराज पंप
खिंडवाडी चौक
क्षेत्रमाहुली थांबा
कोडोली देगाव फाटा
खोडशी
गोटे
हजारमाची
डुबलमळा
राजमाची वळण
बसस्थानक
मलकापूर
नांदलापूर
कोल्हापूर नाका