जिल्ह्यात सहा महिन्यांनंतर उच्चांकी कोरोना रुग्णवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:36 AM2021-04-03T04:36:11+5:302021-04-03T04:36:11+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले असून मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, शुक्रवारी तब्बल ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले असून मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, शुक्रवारी तब्बल ७४२ बाधित स्पष्ट झाले. मागील सहा महिन्यांतील ही उच्चांकी वाढ ठरली आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ८०० रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केल्यानुसार ७४२ नवीन कोरोनाबाधित स्पष्ट झाले आहेत. सातारा शहराबरोबरच तालुक्यातील गजवडी, आकले, साबळेवाडी, कुस बुद्रुक, नित्रळ, आरे, अंबवडे बुद्रुक, कोंडवे, परळी, धावडशी, निसराळे, पाडळी, कोपर्डे, खोजेवाडी, काशिळ, नांदगाव, नागठाणे, क्षेत्रमाहुली, भरतगाववाडी, खेड आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली. तर कऱ्हाड शहराबरोबरच तालुक्यातील ओगलेवाडी, काले, मलकापूर, शेरे, हजारमाची, तांबवे, उंडाळे, येणके, कोळे, मालखेड, उंब्रज, आगाशीवनगर, सैदापूर येथे नवीन रुग्ण आढळले. पाटण तालुक्यात कुंभारगाव, आचरेवाडी, मल्हारपेठ, धावडे, ठोमसे, दिवशी, त्रिपुडी, सणबूर, तारळे, तळमावले, ढेबेवाडीत रुग्णांची नोंद झाली.
फलटण तालुक्यात शहराबरोबरच आसू, मुंजवडी, जाधववाडी, आदर्की, बिबी, हणमंतवाडी, तरडगाव, गिरवी, वाखरी, झिरपवाडी, कोळकी, काळज आदी गावांत रुग्ण आढळले. खटाव तालुक्यात खटाव, अंबवडे, पळशी, गोपूज, दरुज, कातरखटाव, वडुज, पडळ, मायणी, चितळी, बुध, डिस्कळ, निढळ आदी गावांत तर माण तालुक्यातील गोंदवले खुर्द, किरकसाल, मलवडी, वावरहिरे, म्हसवड, पानवण, विरळी, जाशी, दहिवडी, टाकेवाडी, भाटकी गावांत रुग्ण स्पष्ट झाले आहेत. कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील तळीये, दुधनवाडी, पळशी, देऊर, त्रिपुटी, किन्हई, सातारा रोड, भक्तवडी, पाडळी स्टेशन, नलवडेवाडी, पिंपोडे बुद्रुक, विखळे, वाठार स्टेशन, कन्हेरखेड, रहिमतपूर, सोनके, पिंपरी, निगडी, साप, न्हावी, नांदवळ, नांदगिरी, एकंबे, अनपटवाडी, धामणेर, तासगाव आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली.
खंडाळा तालुक्यात खंडाळा, पारगाव, लोणंद, शिरवळ, अहिरे, धावडवाडी, आसवली, भोसलेवाडी, घाटदरे, दापकेघर, दापटेघर, निरा, शेरेचीवाडी, शेखमिरवाडी, धनगरवाडी, आसवली येथे रुग्ण आढळले. वाई तालुक्यात वाई, गुळुंब, वेळे, कवठे, सुरुर, पसरणी, मालतपूर, मालगाव, ओझर्डे, किकली, भुईंज, आनेवडी, लोहारे, आसले, बावधन, धोम, किकली आदी गावांत रुग्णांची नोंद झाली. महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वरसह पाचगणी, काळमगाव, अवकाळी, दांडेघर, भेकवली, भिलार तर जावळी तालुक्यात कुडाळ, रुईघर, काळोशी, कुसुंबी, बोंडारवाडी, भुतेघर, प्रभूचीवाडी, मोहाट, बामणोली, सानपाने, मेढा, आनेवाडीत नवीन रुग्ण आढळून आले.
...................................................................................