सर्वात उंच ‘भांबवली धबधबा’ आता पाहा अधिक जवळून !

By admin | Published: July 22, 2016 11:28 PM2016-07-22T23:28:53+5:302016-07-23T00:09:16+5:30

पर्यटकांना व्यवस्थित पाहण्यासाठी ‘व्ह्यू पॉइंट’च्या जागेला परवानगी

The highest 'Bhambahi Falls' now look more closely! | सर्वात उंच ‘भांबवली धबधबा’ आता पाहा अधिक जवळून !

सर्वात उंच ‘भांबवली धबधबा’ आता पाहा अधिक जवळून !

Next

सातारा : देशातील सर्वात उंच धबधबा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘भांबवली’चे दृश्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळली आहेत. मात्र, हा धबधबा पाहण्यासाठी गावाजवळ वाहने लावून कैक किलोमीटर चालत जावे लागायचे. पर्यटकांची ही कुचंबणा ओळखून भांबवलीच्या ग्रामस्थांनी धबधब्याजवळच ‘व्ह्णू पॉइंट’ तयार करण्यास परवानगी दिली असून यासाठी लागणाऱ्या रस्त्याच्या जागेलाही ‘ना हरकत’ प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लिहून दिले आहे.
आजपर्यंत कर्नाटकातील ‘जोग फॉल्स’ हाच सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जायचा. ‘जोग फॉल्स’ची उंची २५२ मीटर म्हणजे ८३९ फूट इतकी आहे. मात्र, सातारा जिल्ह्णातील भांबवलीच्या वजराई धबधब्याची उंची ५६० मीटर असल्यामुळे हाच देशातील सर्वात उंच धबधबा असल्याची पोस्ट काही पर्यटकांनी सोशल मीडियावर टाकली. गेल्या काही महिन्यांपासून भांबवली धबधब्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आपसूकच हजारो पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी कास पठाराकडे वळताहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून मनाजोगा पाऊस झाल्यामुळे कास पठार परिसरातील बहुतांश धबधबे कोसळू लागले असून शेकडो झऱ्यांनी सह्णाद्रीच्या पर्वतरांगा फुलून निघाल्या आहेत. या सर्वांचा राजा म्हणून ओळखला जाणारा भांबवलीचा वजराई धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे.
हा धबधबा पाहण्यासाठी कास गावाच्या पुढे डावीकडे वळाल्यानंतर आतमध्ये असणाऱ्या भांबवलीत वाहने ठेवून चालत जंगलात जावे लागते. तेथे निसरड्या दगडांवर उभारुन धबधब्यासोबत फोटो काढण्याची कसरतही पर्यटकांना करावी लागते. (प्रतिनिधी)

Web Title: The highest 'Bhambahi Falls' now look more closely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.