साताऱ्यात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान; ४१.६ अंशांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:39 PM2019-04-26T23:39:19+5:302019-04-26T23:39:25+5:30
सातारा : सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सूर्यनारायण तळपू लागल्याने कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तर सातारा शहरातील तापमान ४१.६ ...
सातारा : सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सूर्यनारायण तळपू लागल्याने कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तर सातारा शहरातील तापमान ४१.६ अंशांवर पोहोचले होते. दोन वर्षांतील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. त्याचबरोबर पूर्व भागात तर तापमाने ४२ अंशांचा टप्पा केव्हाच पार केला आहे.
मार्च महिन्यापासून सातारा जिल्ह्यात कमाल तापमान वाढू लागले. मार्चच्या मध्यापर्यंत तापमान ३५ अंशांच्या दरम्यान होते. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होत गेली. तर एप्रिल महिन्यात सतत कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढेच राहिले. ४ एप्रिलला २०१९ या वर्षातील सर्वात अधिक तापमान साताºयात नोंदले गेले व प्रथमच ४० अंशांचा टप्पाही पार केला. या दिवशी ४०.३ अंश तापमान होते. त्याचवेळी या वर्षातील उन्हाळा अधिक तीव्र असणार हे स्पष्ट झाले. तर त्यानंतर ११ एप्रिलला ४.६ अंश तापमान नोंदले गेले.
एप्रिल महिन्यात आतापर्यंतच्या २६ दिवसांत ७ वेळा कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला. तर शुक्रवारचे तापमान दोन वर्षांतील उच्चांकी ठरले. सातारा शहरात ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच दुसरीकडे किमान तापमानातही वाढ होत असल्याने दिवसा तसेच रात्रीही उकाडा जाणवत आहे.
दरम्यान, सूर्य आग ओकू लागल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरही तुरळक वाहने दिसत असतात. तसेच बाजारपेठेतही नागरिकांची फारशी वर्दळ नसते. नागरिक घरात थांबणेच पसंद करतात तर अनेकजण झाडाची सावली, बागांमध्ये आसरा घेताना दिसत आहेत.
माण, खटावमध्ये
तीव्र झळा...
सातारा शहरात तापमानाची नोंद होते. त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद ही पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत होते. साताºयात शुक्रवारी ४१.६ अंश तापमान नोंद झाले असलेतरी या दोन तालुक्यांतील तापमानाने ४२ अंशांचा टप्पा केव्हाच पार केलाय. या तालुक्यात तर दूरदूर झाडे नसतात. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा लागतात.
दिनांक किमान कमाल
तापमान तापमान
२० एप्रिल १८.८ ३७.४
२१ एप्रिल २०.६ ३७.४
२२ एप्रिल २०.८ ३८.७
२३ एप्रिल २२.७ ४०.१
२४ एप्रिल २५.२ ४०.६
२५ एप्रिल २६ ४०.४
२६ एप्रिल २६.८ ४१.६