महामार्गाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव द्यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:43 AM2021-08-21T04:43:41+5:302021-08-21T04:43:41+5:30
यावेळी सुंदरगड संवर्धन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, राष्ट्रवादी ...
यावेळी सुंदरगड संवर्धन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटण तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, शिवसेना पाटण तालुकाप्रमुख सुरेश पाटील, चंद्रकांत मोरे, मनोहर यादव, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, गणेश मोरे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर-विजापूर हा १८३.८० किलोमीटर लांबीचा एनएच १६६ राष्ट्रीय महामार्ग असून, या महामार्गाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण करावे. या राष्ट्रीय महामार्गाला अनन्यसाधारण असे ऐतिहासिक महत्त्व आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास व स्मृती जागृत ठेवण्यासाठी हे नाव देणे गरजेचे आहे. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आले. यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे, पोलीस निरीक्षक एन. आय. चौखंडे उपस्थित होते.