महामार्गाचे काम रडत-खडत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:28 AM2021-02-22T04:28:18+5:302021-02-22T04:28:18+5:30
सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ ...
सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे.
सातारा-पंढरपूर या महामार्गाचे काम सुरू होऊन साडेतीन वर्षे झाली आहेत. पण, अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा महामार्ग कोरेगाव, पुसेगाव, गोंदवले आणि म्हसवडवरून जातो. या मार्गावरून मराठवाड्यात जाता येते. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
.................................................
भारनियमनामुळे रात्रीही पिकांना पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कृषी पंपासाठी भारनियमन होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळीही पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करावे लागत आहे. यामुळे थंडीसह अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागत आहे. कृषीपंपासाठी विजेचे भारनियमन होते. आठवड्यातून काही दिवस वीज दिवसा असते, तर काहीवेळा रात्रीचा वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येतो. पिकांना वेळेत पाणी मिळावे, म्हणून शेतकरी रात्र-रात्र जागतात. अशावेळी काहीवेळा वीजपुरवठा खंडित होतो. तसेच अंधारातही काही दिसत नाही. तरीही अशा संकटांचा सामना करत पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
.................................................................................