महामार्गाचे काम रडत-खडत सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:06+5:302021-03-26T04:40:06+5:30

सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ ...

Highway work continues tear-jerking | महामार्गाचे काम रडत-खडत सुरूच

महामार्गाचे काम रडत-खडत सुरूच

googlenewsNext

सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे.

सातारा-पंढरपूर या महामार्गाचे काम सुरू होऊन साडेतीन वर्षे झाली आहेत; पण अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा महामार्ग कोरेगाव, पुसेगाव, गोंदवले आणि म्हसवडवरून जातो. या मार्गावरून मराठवाड्यात जाता येते. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मार्गाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

.................................................

अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील शिरताव ते वरकुटे मलवडी या रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. सुमारे नऊ किलोमीटरच्या या अंतरात अनेक ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. त्यातच रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर वाहन आल्यास रस्त्यावरून खाली घ्यावे लागते. अशावेळी वाहन घसरत आहे. अनेकवेळा दुचाकीस्वार पडण्याचीही घटना घडली आहे. संबंधितांनी लक्ष देऊन डांबरीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

........................................................................

अस्वच्छतेमुळे दुर्गंधी निर्माण

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात; तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात. कधी कधी हा कचरा रस्त्यावर येतो, दुर्गंधी पसरते. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.

.......................................................

खड्यांमुळे वाहनांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा-कास रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सातारा शहराजवळील यवतेश्वर घाटातून कास मार्ग जातो. या मार्गावर घाटातही जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तसेच साईडपट्टीही खचली आहे. तर कासकडे जातानाही अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. चऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागते. रात्रीच्या सुमारास तर नवीन वाहनधारकांना रस्ता व खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने आदळतात. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.

..............................................

Web Title: Highway work continues tear-jerking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.