राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत हिना बागवान प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:38 AM2021-04-25T04:38:10+5:302021-04-25T04:38:10+5:30
वाई : वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाची बी.एस्सी. भाग २ ची विद्यार्थिनी हिना सादिक बागवान ...
वाई : वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाची बी.एस्सी. भाग २ ची विद्यार्थिनी हिना सादिक बागवान हिने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. बाबूरावजी बुटले कला, नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय, दिग्रस, जि. यवतमाळ या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून एकूण १३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 'मिठाचा सत्याग्रह : राजकीय चळवळीला आर्थिक जोड' या विषयावर तिने निबंधाचे लेखन केले होते. बागवान हिने आजपर्यंत अनेक निबंध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष मा. प्रतापराव भोसले, अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सर्व संचालक, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्र. प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, तिन्ही विभागांचे उपप्राचार्य, डॉ. भानुदास आगेडकर, प्रा. विलास करडे, डॉ. रमेश वैद्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी तिचे कौतुक केले.