हिंगणगाव रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:12+5:302021-04-10T04:38:12+5:30
आदर्की : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने व संभाजी महाराज बलिदान मास यांचे औचित्य साधून हिंगणगाव ग्रामस्थ व ...
आदर्की : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने व संभाजी महाराज बलिदान मास यांचे औचित्य साधून हिंगणगाव ग्रामस्थ व तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा व रक्तदात्याचा तुटवडा जाणवत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून येत असल्याने, हिंगणगाव ग्रामस्थ व तरुण मंडळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन अक्षय रक्तपेढी सातारचे सतीश सांळुखे यांचे मार्गदर्शनाखाली ६४ पुरुषांनी व एका महिलेने रक्तदान केले.
कोरोना नियमाचे पालन करून ग्रामस्थ व तरुण मंडळाने शिबिर पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. रक्तदान शिबिराचा प्रारंभ कांताबाई आत्माराम जाधव या महिलेने रक्तदान करून ६४ ग्रामस्थ व तरुणांनी
रक्तदान केले.
फोटो - हिंगणगाव ता.फलटण येथे रक्तदान शिबिराच्या वेळी ग्रामस्थ व तरुण मंडळ.