हिंगणगावचे विलगीकरण कक्ष रोल मॉडेल : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:30+5:302021-05-30T04:30:30+5:30

आदर्की : ‘ग्रामस्थ, विविध संस्था, तरुण मंडळ, ग्रामपंचायत, व्यवस्थापन समिती व गावच्या एकजुटीतून कोरोना विलगीकरण कक्ष सुरू केले. कोरोना ...

Hingangaon Separation Room Role Model: Singh | हिंगणगावचे विलगीकरण कक्ष रोल मॉडेल : सिंह

हिंगणगावचे विलगीकरण कक्ष रोल मॉडेल : सिंह

Next

आदर्की : ‘ग्रामस्थ, विविध संस्था, तरुण मंडळ, ग्रामपंचायत, व्यवस्थापन समिती व

गावच्या एकजुटीतून कोरोना विलगीकरण कक्ष सुरू केले. कोरोना रुग्णांची सर्वांगीण व्यवस्था, स्वच्छता व ध्वनिक्षेपकावरून कीर्तन, भजन, ऐकविली जाते. यामुळे हिंगणगावचे विलगीकरण कक्ष जिल्हाला रोड मॉडेल ठरेल,’ असा विश्वास जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

हिंगणगाव (ता. फलटण) येथे कोरोना संसर्ग वाढत असल्याने ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत विलगीकरण कक्षाची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. बैठकीत हिंगणगाव येथील कोरोना संसर्गाबाबत शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा, ग्रामपंचायत, व्यवस्थापन समिती यांच्याकडून आढावा घेऊन सूचना केल्या.

विलगीकरण कक्षाची पाहणी करताना रुग्णांची व्यवस्था, महिला, पुरुषांसाठी स्वंतत्र स्वच्छतागृहाची सोय, अंघोळीची स्वतंत्र सोय, ग्रामस्थ मंडळाकडून कोरोना रुग्णांना नाष्टा, जेवण व सोसायटीकडून जारचे मोफत पाणी दिले जाते. ही व्यवस्था पाहून हिंगणगाव पटर्न जिल्ह्यात राबविणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी अमिता गावडे, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल कदम, मंडलाधिकारी गायकवाड, सरपंच, उपसरपंच, सदस्य, व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Web Title: Hingangaon Separation Room Role Model: Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.