हिरकणी करणार १११ किमीची र्व्हच्युअल रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:16+5:302021-01-17T04:33:16+5:30

सातारा : नऊवारी रन घेऊन शिवजयंतीचे जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या साताऱ्यातील हिरकणी ग्रुपच्या वतीने यंदा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ते ...

Hirkani will run a virtual run of 111 km | हिरकणी करणार १११ किमीची र्व्हच्युअल रन

हिरकणी करणार १११ किमीची र्व्हच्युअल रन

Next

सातारा : नऊवारी रन घेऊन शिवजयंतीचे जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या साताऱ्यातील हिरकणी ग्रुपच्या वतीने यंदा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ते अखेरची राजधानी अजिंक्यतारापर्यंत व्हर्च्युअल रनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. शुभांगी गायकवाड यांनी दिली.

येथील हिरकणी ग्रुपने गतवर्षी शिवजयंतीनिमित्त नऊवारी रन घेऊन शिवजयंती साजरी करण्यात वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. यावर्षीदेखील वेगळ्या प्रकारे व कोरोनामुळे जास्त महिलांनी एकत्र न येता वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिरकणी ग्रुप यंदाही ही अल्ट्रा रन वेगळ्या पद्धतीने पूर्ण करून विश्व विक्रम नोंदवणार आहेत.

तसेच जिजाऊ जयंती दिवशी याचे रजिस्ट्रेशन लिंक ओपन होत आहे. महिलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या सेल्फ डिफेन्सचे फ्री वर्क शॉपदेखील घेण्यात येणार आहेत. ज्या महिला त्याकरिता उत्सुक आहेत त्यांनी हिरकणी ग्रुपशी संपर्क साधावा.

रजिस्टर फ्री.

चौकट

साताऱ्यासह जगभरातील महिलांना यासाठी विनामूल्य सहभाग नोंदविता येणार आहे. १२ जानेवारी जिजाऊ जयंती ते १९ फेब शिवजयंती रोज फक्त घरच्या घरी ३ किलोमीटर चालून १११ किलोमीटर सव्वा महिन्यात सहज पूर्ण करू शकतो. रोज वर्क आऊटचे फोटो साताराच्या हिरकणी या फेसबुक ग्रुपवर पोस्ट करून या वर्षी शिवजयंती उत्सव घराघरांत साजरा करून नऊवारी साडीतील फोटो काढून ग्रुपवर पाठविण्याचे आवाहन जयश्री शेलार यांनी केले आहे.

Web Title: Hirkani will run a virtual run of 111 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.