स्थानिक पातळीवर इतिहास लिहिला जाईल : वेताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:00+5:302021-08-21T04:44:00+5:30
कोपर्डे हवेली : ‘कोरोनाच्या कालखंडात आपण अहोरात्र रुग्णांची सेवा करण्यासाठी झडत होतो. त्यासाठी स्थानिक पातळीवर तुमचा इतिहास लिहिला जाईल, ...
कोपर्डे हवेली : ‘कोरोनाच्या कालखंडात आपण अहोरात्र रुग्णांची सेवा करण्यासाठी झडत होतो. त्यासाठी स्थानिक पातळीवर तुमचा इतिहास लिहिला जाईल, अशी माणसे जन्माला येणे दुर्मीळच,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चेचे राज्य सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले.
कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील कोरोना योद्धा किशोर साळवे यांचा स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, पैलवान अक्षय चव्हाण, शरद चव्हाण, प्रकाश पाटील, शुभम चव्हाण, अनिकेत भोसले, सुनील चव्हाण, निखिल चव्हाण, श्रीकांत झेंडे, रोहित चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
वेताळ म्हणाले, ‘किशोर साळवे गेल्या सहा महिन्यांपासून परिसरातील कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. घरची परिस्थिती बेताची असली तरी ते समाजसेवा करीत आहेत. प्रसिद्धीपासून दूर व विनामोबदला काम करीत असल्याने आज समाज त्याची दखल घेत आहे.’