कोयना धरणग्रस्तांकडून वृक्षारोपणाने होळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:30+5:302021-03-30T04:22:30+5:30

कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणग्रस्तांनी रविवारी कोयना भागातील अनेक गावांत ...

Holi celebrated with tree planting by Koyna dam victims | कोयना धरणग्रस्तांकडून वृक्षारोपणाने होळी साजरी

कोयना धरणग्रस्तांकडून वृक्षारोपणाने होळी साजरी

Next

कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणग्रस्तांनी रविवारी कोयना भागातील अनेक गावांत होळी सणाचे औचित्यसाधून वृक्षारोपण, वन व खासगी हद्दीतील वणवा विषयीची जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोयना परिसरात हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. हा नजराणा पाहण्यासाठी दूरवरचा निसर्गप्रेमी आला पाहिजे. यासाठी येथील पर्यटनस्थळ विकास झाला पाहिजे. ‘लोक जंगल’ ही संकल्पना घेऊन भविष्यात स्थानिकांना रोजगारनिर्मिती औषध वनस्पतीची लागवड, बांबू लागवड याविषयी प्रशिक्षण गरजेचे आहे. त्यातून रोजगारनिर्मिती होण्यासाठी श्रमिक मुक्ती दल, सह्याद्री सोशल फाैंडेशन व डिसकव्हर कोयना हे प्रयत्नशील राहणार आहेत. तसेच कोयना भागातील खासगी व वनविभागाच्या हद्दीत दरवर्षी वणवे लावण्यात येत आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या वृक्षवेली, फुले जळत आहेत तसेच विविध जातीचे जीवजंतू होरपळून मृत्यूमुखी पडत आहेत. यामुळे काही जैवविविधतेतील घटक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतजमिनीची धूपही होत आहे. वणवा हा गैरसमजांतून व विकृतीतून लावले जात आहेत. हे टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधनासाठी वणवा प्रतिबंधक अभियान आयोजित केले होते.

या कार्यक्रमास बळिराम कदम, सचिन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, श्रीपती माने, चंद्रकांत कदम, राजू मोरे, तानाजी बेबले, प्रवीण साळुंखे, अनिल देवरूखकर, राम कदम, पी. डी. लाड, विजय शेलार उपस्थित होते.

Web Title: Holi celebrated with tree planting by Koyna dam victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.