होळी संपली; जिल्हा तापला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:53+5:302021-03-31T04:39:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच होळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच होळी दिवशीच कमाल तापमान ३८ अंशावर पोहोचल्याने जिल्हा तापू लागला. तर सध्या उष्ण वारेही वाहत असून सातारा शहरातील कमाल तापमान ३९ अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने सातारकर घामाघूम होऊ लागले आहेत.
जिल्ह्यात हिवाळी ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होते. एक वेळ फक्त तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमान हे सतत १४ ते १५ अंशावर राहिले. त्यामुळे यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. आता मार्च महिना संपत आला असून किमान तापमान २० अंशावर जाऊ लागले आहे. तर कमाल तापमानही ३५ अंशावर कायम आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे.
सातारा शहरात तर कमाल तापमान सतत ३५ अंशावार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर ऊन वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहेत. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमान हे ३८ अंशावर राहिले आहे. यामुळे उन्हाची तीव्रता आणखी वाढत जाणार, हे स्पष्ट झाले आहे.
चौकट : साताऱ्यातील किमान आणि कमाल तापमान असे...
दि. १५ मार्च १८.०२ ३५.०७
दि. १६ मार्च १८.०८ ३६.०१
दि. १७ मार्च १९ ३६.०४
दि. १८ मार्च १९.०५ ३६.०४
दि. १९ मार्च २१.०४ ३५.०५
दि. २० मार्च १९.०१ ३५.०१
दि. २१ मार्च १८.०९ ३४.०५
दि. २२ मार्च १९.०१ ३५.०८
दि. २३ मार्च २१.०५ ३३.०५
दि. २४ मार्च २०.०७ ३६.००
दि. २५ मार्च १९.०३ ३६.०१
दि. २६ मार्च २०.०५ ३८.०१
दि. २७ मार्च २०.०४ ३८.००
दि. २८ मार्च २०.०० ३८.०५
दि. २९ मार्च १९.०७ ३८.०९
दि. ३० मार्च २०.०५ ३७.०३
...............................................................