पश्चिम महाराष्ट्रात घरफोड्या करणारा अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:15 AM2020-06-22T10:15:07+5:302020-06-22T10:17:08+5:30
सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या मयूर जयवंत बनकर (वय २०, रा. लोणंद, ता. खंडाळा) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. फलटण ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिंगवणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागात चोऱ्या केल्याची त्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे कबुली दिली आहे. त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सातारा : सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या मयूर जयवंत बनकर (वय २०, रा. लोणंद, ता. खंडाळा) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. फलटण ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिंगवणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागात चोऱ्या केल्याची त्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे कबुली दिली आहे. त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित मयूर बनकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत आहे. त्याच्यावर फलटण ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिंगवणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने व त्याच्या टोळीने घरफोडी, चोऱ्या, जबरी चोरी, दुचाकी चोरीचे गुन्हे केले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
दि. २० रोजी कोळकी (ता. फलटण) गावात मयूर बनकर येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या. जºहाड यांनी कोळकी परिसरात सापळा लावला असता संशयित सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, आदींनी ही कारवाई केली.