गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:53+5:302021-07-29T04:38:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आपला स्वत:चा व हक्काचा निवारा असावा; असं स्वप्न प्रत्येकजण उराशी बाळगत असतो. काहींच स्वप्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आपला स्वत:चा व हक्काचा निवारा असावा; असं स्वप्न प्रत्येकजण उराशी बाळगत असतो. काहींच स्वप्न पूर्ण होतंही. मात्र, अनेकांना हे स्वप्न पूर्ण करताना अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. एकीकडे बॅँकांकडून मिळणारे गृहकर्ज स्वस्त असले तरी दुसरीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे आपल्या घराचं स्वप्न कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
(चौकट)
असे आहेत गृहकर्ज दर
स्टेट बॅँक ऑफ इंडिया ६.७०
बॅँक ऑफ इंडिया ६.७०
बॅँक ऑफ महाराष्ट्र ६.६५
एचडीएफसी ६.७५
आयसीआयसीआय ६.७५
(चौकट)
- शहरात घरांच्या किमती अफाट आहेत. जागेच्या किमतींचा तर सर्वसामान्य नागरिक विचारही करू शकत नाहीत.
- दुसरीकडे शहरापासून दूर गावाकडे घर व जागेच्या किमती या कमी आहेत. येथे घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्यातही आहे.
- परंतु, गावावरून शहरात ये-जा करणे महागात पडत असल्याने गावात स्वत:चं घर बांधण्याचा विचारही अनेकांनी तूर्त दूरच ठेवला आहे.
(चौकट)
बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच
साहित्य २०१८ २०१९ २०२० २०२१ (जुलै)
सिमेंट २२० २४० २६० ३६०
विटा ९ १० १० १३
वाळू ४५०० ९००० १०००० १२०००
खडी १८०० २००० २१०० २४००
स्टील ३८ ४८ ५८ ५५.७०
(कोट)
घर घेणे कठीणच...
कोरोनामुळे आमची आर्थिक घडी विस्कटली आहे. दुसरीकडे गृहकर्ज स्वस्त असले तरी बांधकाम साहित्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे नवीन घर बांधणे कठीण होऊन बसले आहे.
- महेश पाटील, सातारा
(कोट)
कोरोनामुळे जगणे मुश्किल झाले असताना महागाई मात्र काही कमी होईना. बांधकाम साहित्याचे दर इतके वाढलेत की, स्वत:चं घर बांधण्याचा विचार करवत नाही. दर कमी होणे गरजेचे आहे.
- निशांत पवार, सातारा
(कोट)
साहित्य विक्रेते म्हणतात...
लॉकडाऊनमध्ये केवळ बांधकाम उद्योग सुरू होता. याचा पुरवठादारांनी चांगलाच फायदा घेतला. दरम्यान, मागणी वाढल्याने सिमेंट, वाळू, विटा, स्टील यांसह सर्वच साहित्याचे दर वाढविण्यात आले. याचा व्यावसायिक व नागरिकांना फटका बसला.
- अमित धनवडे, बांधकाम व्यावसायिक
(कोट)
महागाईचा बांधकाम साहित्य विक्रीलादेखील फटका बसला आहे. पूर्वी सिमेंटची बॅग दोनशे रुपयांना होती, आता ती साडेतीनशे रुपये झाली आहे. इतर साहित्याच्या दरातही पाचे ते दहा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांनी घर बांधणे तूर्त लांबणीवर ठेवले आहे.
- संतोष पवार, बांधकाम साहित्य विक्रेता